सफाई कामगार पुनर्वसन योजना – वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित
राष्ट्रीय स्तरावर अस्वच्छ काम करणा-या सफाई कामगारांचे वत्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्याकरिता राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ, या महामंडळाची स्थापना करण्यात आली असून, या योजनेत रू.5 लाखापर्यंत अर्थसहाय्यकेले जाते. हे अर्थसहाय्य सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळाकडून केले जात असून जिल्ह्याच्या ठिकाणी ही योजना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे राबविली जाते.
व्यवस्थापकीय संचालक, जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर, 1 ला माळा, गुलमोहर क्रॉस रोड नं. 9, जे.व्ही.पी.डी.स्कीम, विलेपार्ले (प), मुंबई – 400 049. दुरध्वनी क्रमांक 022-26202588022-26202588 , 26202586
यंत्रणेचे नाव | महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित |
कोणासाठी | अनुसूचित जाती |
किमान शैक्षणिक पात्रता | आवश्यकता नाही |
वयोमर्यादा (वर्षे) | 18 ते 45 |
लिंग | पुरूष / महिला |
कार्यक्षेत्र | ग्रामीण / शहरी |
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न (ग्रामीण भागासाठी) | आवश्यकता नाही |
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न (शहरी भागासाठी) | आवश्यकता नाही |
ठळक वैशिष्ठये | स्वच्छतेच्या कामाकरिता उपयोगात येणारे वाहन व इतर साहित्य निर्मितीकरिता विशेष बाब म्हणून रु.10.00 लाखांपर्यंत कर्ज 8% व्याजदराने दिले जाते. प्रकल्पाच्या संपूर्ण रक्कमेपैकी 75% रक्कम राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ व 20% रक्कम महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत देण्यात येते. |
कमाल कर्जमर्यादा | रू. 5.00 लाख |
बँकेचा सहभाग व व्याजदर | |
स्वतःचा सहभाग | 5% |
यंत्रणेचा सहभाग व व्याजदर | 95% व व्याजदर 4% व 6% प्रमाणे |
अनुदान | Rs.10000/- |
तारण | यंत्रणेच्या नियमानुसार |
इ. एम. आय. | यंत्रणेच्या नियमानुसार |
परतफेडीची सुरूवात | 3 महिन्यानंतर किंवा व्यवसायानुसार |
परतफेडीचा कालावधी | 60 महिने |
शेरा | राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ च्या कर्जाची परतफेड वेळेत न केल्यास 2% दंडव्याज आकारण्यात येते. उमेदवाराचा स्वतःचा सहभाग 1 लाख प्रकल्प मर्यादेपर्यंत निरंक व त्यापुढे 5% असतो. |
संकलन - अमरीन पठाण
0 comments: