29 November 2015

समाज कल्‍याण - सामुहिक योजना

1.     सामुहिक योजना
2.     दलित वस्तीस ग्रंथालय कपाट, टेबल इ.पुरविणे
3.     नविन समाज मंदीर बांधकाम (स्मशानभूमि, व्यायाम शाळा आदिवासी गाव व वस्त्यांसाठी तसेच अनु. जातीची ५० पेक्षा कमी मा.व. वस्ती
4.     दलितवस्ती/समाजमंदिरामध्ये ग्रंथालयास सौर पथदिप/इमर्जन्सी लाईट
सामुहिक योजना
दलित वस्तीस ग्रंथालय कपाट, टेबल इ.पुरविणे
पात्रतेबाबतचे निकष
१)  योजनेची प्रसिध्दी पंचायत समित्यांनी ग्रामस्तरावर सर्वदुर करावी.
२) योजनेचा लाभ यापूर्वी एकादाही मिळालेला नाही अशा मागासवर्गीय वस्त्यांना प्राधान्य देण्याची दक्षता घ्यावी.
३) ग्रंथालयातील पुस्तके घरी वाचण्यास देऊ नयेत.  संबधित ग्रा.पं. ने पुस्तकाची नोंदवही अद्यायावत ठेवावी.
४) ग्रथालयातील पुस्तके गहाळ, चोरी होणार नाहीत अथवा त्यांचा वाळवी लागणार नाही किंवा ते पावसाने भिजणार नाही याची सर्व जबाबदारी संबधित ग्रा.पं. वर राहिल तसा ग्रा.पं. वर राहिल तसा ग्रा. पं. चा ठराव आवश्यक आहे
५) ग्रथालय सोईनुसार ठराविक वेळेत उघडे ठेवावे.  सदरची वेळ समाजमंदिर देखभाल समिती व ग्रा.पं. समन्वयाने ठरवेल
६) सदरचे अनुदान ग्रा.पं. स वस्तूस्वरुपात देय राहिल त्यामध्ये रक्कम रु. १५,०००/- फर्निचरसाठी व  रु. १०,०००/- पुस्तकांसाठी राहिल.
७) प्रस्ताव ग्रामसभेकडून शिफारस होऊन संबधित गट विकास अधिकारी यांचे मार्फत समाज कल्याण विभागास विहित प्रपत्रात प्राप्त झालेनंतर समाज कल्याण समिती मध्ये मान्यता देण्यात येईल
८) सदरची योजना दलित वस्ती मध्ये राबविण्यात यावी.  दलित वस्ती मध्ये समाज मंदीर नसेल अथवा पुरेशी
नविन समाज मंदीर बांधकाम (स्मशानभूमि, व्यायाम शाळा आदिवासी गाव व वस्त्यांसाठी तसेच अनु. जातीची ५० पेक्षा कमी मा.व. वस्ती
पात्रतेबाबतचे निकष
१) सदर योजना अनु.जमाती वस्तीसाठी व अनु.जातीची ५० पेक्षा कमी वस्ती आहे तेथे राबविण्यात यावी.
२) या योजनेतंर्गत पूर्वी  लाभ दिलेला नसावा.
३) सदर योजना दलित वस्ती सुधार योजना या योजनेच्या नियम अटी शर्तीनुसार ग्रा.पं. स रककम अदा करावी.
४) अपूर्ण कामे प्रथ्‌ंम प्राधान्याने पूर्ण करणेसाठी अपूर्ण कामे पूर्ण झालेनंतरचा नविन प्रस्तावांना मंजूरी.
५) योजनेची निवड ग्रामसभेत करण्यात यावी.
६) शा.नि. मागास/१०९८/प्रक्र.७३/३४ दि. २०/१०/१९९९ नुसार नमूद केलेल्या अटी व शर्ती लाभार्थीवर बंधनकारक राहतील.

दलितवस्ती/समाजमंदिरामध्ये ग्रंथालयास सौर पथदिप/इमर्जन्सी लाईट
पात्रतेबाबतचे निकष
१)   सदर योजना मागासवर्गीय संवर्गातील दलितवस्तीमध्ये समाजमंदिर/ग्रंथालय असलेल्या जागेच्या प्रांगणात सौरपथदिप बसविण्यात यावेत.
२) हमी कालावधीनंतर सौरपथदिप देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ग्रा.पं.ची राहील.
३) सदर योजना महाऊर्जा विभाग यांच्या सहमतीने व मार्गदर्शनाखाली राबविण्यात यावी.
४) ज्या ठिकाणी विद्युत पुरवठा आहे तेथे सौरपथदिप पुरविणेत येणार नाहीत.
५) सौरपथदिपाचा दुरुपयोग झाल्यास किंमतीनुसार दंडात्मक रककम संबंधीत ग्रा.पंचायतीकडुन वसुल करण्यात येईल.
६) दलितवस्तीमध्ये ग्रंथालय व समाजमंदिर सुस्थितीत चालु असल्याचा ग्रा.पं.चा ठराव आवश्यक.

स्‍त्रोत - पुणे जिल्हा परिषद



SHARE THIS

Author:

0 comments: