1. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ
1. अ) बीज भांडवल कर्ज योजना
2. ब) रू. 25,000/- थेट कर्ज योजना
3. निकष -
2. राष्ट्रीय मागासवर्ग वित्तीय व विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्या योजना
1. मुदती कर्ज योजना-
2. मार्जिन मनी कर्ज योजना -
3. शैक्षणिक कर्ज योजना -
4. सक्षम कर्ज योजना -
5. शिल्प संपदा कर्ज योजना -
6. स्वर्णिमा कर्ज योजना -
7. मायक्रो कर्ज योजना -
8. महिला समृध्दी कर्ज योजना -
9. कृषी संपदा -
10. प्रशिक्षण योजना -
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ
गावगाडया बाहेर आजवर बहुतांश जीवन व्यतीत करणा-या तसेच पिढयानपिढया पाठीवर आपले बि-हाड घेऊन भटकंती करणा-या समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्ष्णिक असा सर्वांगणिक विकास करण्याकरीता शासनाने त्यांच्याच बंजारा समाजातील हरीतक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे अखंड 11 वर्षे मुख्यमंत्री पद भुषविणारे कै. वसंतराव नाईक यांच्या नावाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत भटक्या जाती व विमुक्त जमातीच्या विकासाकरीता वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची स्थापना दि. 8 फेब्रुवारी, 1984 रोजी केली आहे.
शासनाने महामंडळाचे अधिकृत भागभांडवल रू. 200.00 कोटी मंजूर करुन दिलेअसून त्यापैकी रू. 161.29 कोटी भाग भांडवल विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या विकासाकरीता उपलब्ध करून दिले आहे.
विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासप्रवर्गाच्या आर्थिक उन्नतीकरीता 4… नाममात्र व्याज दराने व्यवसायाकरीता आर्थिक सहाय्य उपलब्धकरून देऊन भटक्या विमुक्तांना स्थिर होण्याकरीता, व्यवसाय करण्याकरीता बीज भांडवल निधी उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश ठेवून आजपर्यत 73,625 भटक्या विमुक्तांना रू. 172.66 कोटी अर्थसहाय्य करण्यात आलेले आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातींचा सर्वांगीण विकास करण्याकरीता खालीलप्रमाणे योजना राबवित आहे.
बीज भांडवल कर्ज योजने अंतर्गत रू. 5,00,000/- लाख प्रकल्प मर्यादेच्या 25… रक्कम बीज भांडवल रूपाने, नाममात्र 4… व्याज दराने 25… रक्कम महामंडळाकडून दिली जाते व 75… रक्कम राष्ट्रीयकृत बँकेकडून दिली जाते. महामंडळाचे कर्ज 60 हप्त्यामध्ये बँकेसोबत वसूल केले जाते यामध्ये विविधव्यवसाय उदा. किराणा दुकान, कापड दुकान, दुग्ध व्यवसाय, शेळी मेंढी पालन, डॉक्टर, वकील, कृषी व्यवसाय, ट्रक, टॅम्पो, टॅक्सी, रिक्षा इत्यादीव्यवसायाकरीता कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
- या योजने अंतर्गत छोटया व्यवसायाकरीता रू. 25,000/- महामंडळाकडून कर्ज दिले जाते. यामध्ये कर्ज वसुलीचा तीन वर्षाचा कालावधी असतो व 2… वार्षिक व्याज दर आकारला जातो.
वरीलप्रमाणे राज्य शासनाच्या दोन योजनेमार्फत विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या सर्वांगीण विकासाकरीता महामंडळ कटीबध्द आहे.
वरीलप्रमाणे राज्य शासनाच्या दोन योजनेमार्फत विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या सर्वांगीण विकासाकरीता महामंडळ कटीबध्द आहे.
- महामंडळाने योजना राबविण्याकरीता काही निकष व अटी लावलेल्या आहेत. यामध्ये लाभधारक हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
- सक्षम अधिका-यांने दिलेला विमुक्त जाती किंवा भटक्या जमातीचा जातीचा दाखला व वार्षिक उत्पन्न रू. 1.00 लाख एवढे असावे.
- तांत्रिक शिक्षण, प्रशिक्षण घेतल्यास प्राधान्य देण्यात येईल तसे प्रमाणपत्र जोडावे. ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा आहे त्या जागेचा मालकीचा करारपत्र अथवा पुरावा असावा, रेशनकार्ड असावे.
- टेम्पो, रिक्षा व टॅक्सीकरीता आर.टी.ओ. कडील परवाना व वाहन चालक परवाना तसेच एक जामिनदार, सातबारा उतारा व एक जामिन सक्षम असणे आवश्यक आहे. अर्जदार हा 18 ते 45 वयांचा असावा.
- वरीलप्रमाणे महामंडळाच्या विविध योजनांचा फायदा घेण्याकरीता जिल्हा व्यवस्थापकांशी संपर्क साधावा.
राष्ट्रीय मागासवर्ग वित्तीय व विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्या योजना
राष्ट्रीय मागासवर्ग वित्तीय व विकास महामंडळ, नवी दिल्ली यांची अधिकृतवाहिनी म्हणून सन 1994 पासून वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमातीविकास महामंडळाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
राष्ट्रीय मागासवर्ग वित्तीय व विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्या योजनावसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळा मार्फत खालील प्रमाणे योजना राबविल्या जातात.
या कर्ज योजनेची प्रकल्प मर्यादा रु. 10 लाख असून त्यामध्ये राष्ट्रीय महामंडळाचा 85… सहभाग, महामंडळाचा 10… सहभाग व लाभार्थीचा 5… सहभाग असून 6… व्याज दराने कर्ज दिले जाते.
या कर्ज योजनेची प्रकल्प मर्यादा रु. 10 लाख असून त्यामध्येराष्ट्रीय महामंडळाचा 40… सहभाग, बँकेचा 50… सहभाग, महामंडळाचा 5…सहभाग व लाभार्थीचा 5… सहभाग असून 6… व्याज दराने कर्ज दिले जाते.
या कर्ज योजनेची प्रकल्प मर्यादा रु. 5 लाख असून प्रतिवर्ष रू. 1.25 लाख याप्रमाणे कर्ज योजना आहे. या योजने अंतर्गतउच्च शिक्षणाकरीता तसेच वैद्यकीय शिक्षणाकरीता देखील कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. त्यामध्ये राष्ट्रीय महामंडळाचा 90… सहभाग, महामंडळाचा 5… सहभाग व लाभार्थीचा 5… सहभाग असून 4… व्याज दराने कर्ज दिले जाते.
या योजनेची प्रकल्प मर्यादा रु. 10.00 लाख असून यामध्ये राष्ट्रीय महामंळाचा सहभाग 85 …, महामंडळाचा सहभाग 5… असून व्याजदर रु. 5.00 लाखा पर्यंत 6…, व त्यावरील कर्जाकरीता 8… आहे. व कर्ज परत फेडीचा कालावधी 5 वर्ष आहे.
या योजनेची प्रकल्प मर्यादा रु. 10.00 लाख असून यामध्ये राष्ट्रीय महामंळाचा सहभाग 85 …, महामंडळाचा सहभाग 5… असून व्याजदर रु. 5.00 लाखा पर्यंत 6…, व त्यावरील कर्जाकरीता 8… आहे. व कर्ज परत फेडीचा कालावधी 5 वर्ष आहे.
या कर्ज योजनेची प्रकल्प मर्यादा रु. 75,000/- असून या योजनेअंतर्गत महिलांना विशेष प्राधान्य देण्यात येते. त्यामध्ये राष्ट्रीय महामंडळाचा 95… सहभाग व महामंडळाचा 5… सहभाग असून 5… व्याज दराने कर्ज दिले जाते.
या कर्ज योजनेची प्रकल्प मर्यादा रु. 50,000/- असून त्यामध्येराष्ट्रीय महामंडळाचा 90… सहभाग, महामंडळाचा 5… सहभाग व लाभार्थीचा 5… सहभाग असून 5… व्याज दराने कर्ज दिले जाते.
या कर्ज योजनेची प्रकल्प मर्यादा रु. 50,000/- असून त्यामध्ये राष्ट्रीय महामंडळाचा 95… सहभाग व महामंडळाचा 5… सहभाग असून 4… व्याज दराने कर्ज दिले जाते.
या योजनेची प्रकल्प मर्यादा रु. 50,000/- असून राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग 95…, लाभार्थीचा सहभाग 5… व व्याजाचा दर 4… असून कर्ज परत फेदीचा कालावधी 5 वर्ष असा आहे
या योजने अंतर्गत ऑडिओ/व्हीडीओ रपेअरींग, प्लंबर, पशुवैद्यकीयसारखे कत्रिम रेतन, दुध उत्पादन इत्यादीकरीता प्रशिक्षण योजना राबविण्याकरीता राष्ट्रीय मागासवर्ग वित्तीय व विकास महामंडळाकडून अनुदान मिळते व त्यामधून प्रशिक्षण दिले जाते.
स्त्रोत : महान्यूज, ११ मार्च २०१३
0 comments: