प्रस्तावना
सोलापूर जिल्हा हा अवर्षणग्रस्त जिल्हा आहे. मुळातच येथे पावसाचे प्रमाण कमी आहे. या जिल्ह्याला सातत्याने दुष्काळाला सामोरे जावे लागते. मागील 3/4 वर्षात उदभवलेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राहेयोची कामे व विविध उपाययोजना राबविण्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे करण्यात आली. याबाबतचा आढावा या लेखात घेण्यात आला आहे.
राज्यामध्ये उदभवलेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनातर्फे विविध उपायययोजना करण्यात आल्या. दुष्काळामुळे नागरिकांना स्थलांतर करण्याची वेळ येवू नये, यासाठी पुरेसा रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पुढीलप्रमाणे कामे उपलब्ध करुन देण्यात आली.
सन २०१०-११
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतंर्गत 2010-11 मध्ये 107 कुटूंबामधील 145 मजूरांनी कामाची मागणी नोंदविली होती. त्यानुसार 98 कुटूंबातील 136 मजूरांना काम उपलब्ध करुन देण्यात आले होते. त्यापैकी 95 कुटूंबातील मजूरांनी या योजनेमध्ये काम केले. या सर्व कामावरती सन 2010-11 मध्ये 3521 मनुष्य दिवसाची निर्मितीझाली. यामध्ये 7 कुटूंबानी 100 दिवसापेक्षा जास्त दिवस काम केले.सन 2010-11 मध्ये रोजगार हमी योजनेसाठी 225128 कुटूंबातील 448648 मजूरांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 223717 एवढे जॉबकार्ड वितरीत करण्यात आले. सन 2010-11 मध्ये सोलापूर जिल्ह्याचा एकूण खर्च 6.41 लक्ष होता, यामध्ये अकुशल कामावर 4.05 लक्ष, कुशल कामावर 2.14 लक्ष प्रशासकीय खर्चावर 0.22 लक्ष एवढा खर्च करण्यात आला. यामध्ये 33 कामे सुरु करण्यात आली. यामधील 10 कामे पुर्ण केलेले आहेत.
सन २०११-१२
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतंर्गत सन 2011-12 मध्ये 65188 कुटूंबामधील 102522 मजूरांनी कामाची मागणी नोंदविली होती. त्यानुसार 64902 कुटूंबातील 102063 मजूरांना काम उपलब्ध करुन देण्यात आले होते. त्यापैकी 63800 कुटूंबातील 100029 मजूरांनी या योजनेमध्ये काम केले. यासर्व कामांवरती 2011-12 मध्ये 3185429 मनुष्य दिवसाची निर्मिती झाली. यामध्ये 7075 कुटूंबांनी 100 दिवसापेक्षा जास्त दिवस काम केले. सन 2011-12 मध्ये रोजगार हमी योजनेसाठी 263125 कुटूंबातील 517223 मजूरांनी नोंदणी केली होती.त्यापैकी 261603 एवढे जॉबकार्ड वितरीत करण्यात आले. सन 2011-12 मध्ये सोलापूर जिल्ह्याचा एकूण खर्च 7588.92 लक्ष होता यामध्ये अकुशल कामावर5073.68 लक्ष , कुशल कामावर 2417.15 लक्ष व प्रशासकीय खर्चावर 98.08 लक्ष एवढा खर्च करण्यात आला. यामध्ये 9784 कामे सुरु करण्यात आली. यामधील 3430 कामे पुर्ण केलेले आहेत.
सन २०१२-१३
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत सन 2012-13 मध्ये 61439 कुटूंबामधील 101583 मजूरांनी कामाची मागणी नोंदविली होती. त्यानुसार 61347 कुटूंबातील 101429 मजूरांना काम उपलब्ध करुन देण्यात आले होते. त्यापैकी 60764 कुटूंबातील 100384 मजूरांनी या योजनेमध्ये काम केले. या सर्व कामंवरती 2012-13 मध्ये 2955750 मनुष्य दिवसाची निर्मिती झाली. यामध्ये 7407 कुटूंबांनी 100 दिवसापेक्षा जास्त दिवस काम केले. सन 2012-13 मध्ये रोजगार हमी योजनेसाठी 281990 कुटूंबातील 551483 मजूरांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 278377 एवढे जॉबकार्ड वितरीत करण्यात आले. सन 2012-13 मध्ये सोलापूर जिल्ह्याचा एकूण खर्च 7723.19 लक्ष होता. यामध्ये अकुशल कामावर 5294.1 लक्ष, कुशल कामावर 2209.6 लक्ष व प्रशासकीय खर्चावर 219.48 लक्ष एवढा खर्च करण्यात आला. यामध्ये 7448 कामे सुरु करण्यात आली. यामधील 2372 कामे पुर्ण केलेले आहेत.
सन २०१३-१४
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत सन 2013-14 मध्ये माहे सप्टेंबर अखेर 32855 कुटूंबामधील 55513 मजूरांनी कामाची मागणी नोंदविली होती त्यानुसार 32827 कुटूंबातील 55469 मजुरांना काम उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यापैकी 28617 कुटुंबातील 48321 मजूरांनी या योजनमध्ये काम केले. यासर्व कामांवरती 2013-14 मध्ये 1090983 मनुष्य दिवसाची निर्मिती झाली. यामध्ये 2436 कुटूंबांनी 100 दिवसापेक्षा जास्त दिवस काम केले आहे. सन 2013-14 मध्ये रोजगार हमी योजनेसाठी 290662 कुटूंबातील 564734 मजूरांनी नोंदणी केली होती.त्यापैकी 279498 एवढे जॉबकार्ड वितरीत करण्यात आले आहेत. सन 2013-14 मध्ये सोलापूर जिल्ह्याचा माहे सप्टेंबर 2013अखेर एकूण खर्च 2618.63लक्ष झाला आहे. यामध्ये अकुशल कामावर 1751.72 लक्ष, कुशल कामावर 829.58 लक्ष व प्रशासकीय खर्चावर 37.29 लक्ष एवढा खर्च करण्यात आला आहे. सन 2013-14 च्या माहे सप्टेंबर अखेरपर्यंत 1914 कामे सुरु करण्यात आली असून यापैकी 47 कामे पूर्ण केलेली आहेत.
ई मस्टर
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये काम करण्यासाठी मजूराकडे जॉबकार्ड असणे आवश्यक आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये 290662 एवढ्या कुटूंबांचे जॉबकार्ड काढण्यात आले होते. नरेगा कायद्यानुसार मजूराच्या कुटूंबाचे जॉबकार्ड 5 वर्षानंतर नुतनीकरण करणे बंधनकारक आहे. त्या नुसार सोलापूर जिल्ह्यामधील कुटुंबांच्या ज्यांच्या जॉबकार्डचा कालावधी 5 वर्ष पूर्ण झाला आहे अशा सर्व 102173 एवढ्या कुटूंबांचे सन 2013 मध्ये जॉबकार्ड नुतनीकरणाचे काम सर्व स्तरावर मोहिम राबवून पूर्ण करण्यात आलेले आहे. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये जुन्या पध्दतीनुसार हजेरी पटाचा कामावर वापर करण्यात येत होता. परंतू माहे ऑक्टोबर 2012 मध्ये पंढरपूर व बार्शी तालुक्यामध्ये ई-मस्टर (इलेक्ट्रॉनिक मस्टर) चा वापर सुरु करण्यात आला व माहे मार्च 2013 पासून सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ई-मस्टर (इलेक्ट्रॉनिक मस्टर) चा वापर यशस्वीरित्या सुरु करण्यात आला आहे.
इलेक्ट्रॉनिक फंड मॅनेजमेंट सिस्टीम
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये मजूरांना मजुरी अदा करण्यासाठी जुन्या पध्दतीनुसार चेक लिहुन मजुरी अदा करण्याच्या पध्दतीनुसार मजुरांना 15 दिवसामध्ये मजुरी प्रदान करणे शक्य होत नव्हते. यावर उपाय म्हणून EFMS (Electornic Fund Management System) सुरु करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये कागदावरती चेक लिहुन मजुरी अदा करण्याची कार्यवाही कालबाह्य करण्यात आलेली आहे व मजूरांना मजुरी 15 दिवसाच्या आत अदा करण्यासाठी Internet द्वारे मजूराच्या खात्यामध्ये मजुरी जमा केली जाते. या प्रणालीचा वापर होण्यासाठी तहसिलदार, गट विकास अधिकारी ,सहाय्यक लेखाधिकारी, अव्वल कारकुन यांच्या Digital Signature चा वापर करण्यात येतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व अधिका-यांचे Digital Signature काढण्याचे काम पूर्ण झाले असून मोहोळ, दक्षिण सोलापूर व बार्शी या तालुक्यामधील आठ FTO (Fund Transfer Order) तयार करण्यात आलेले असून EFMS प्रणालीनुसार पहिल्यांदाच त्यांची मजूरी अदा करण्यात आलेली आहे. तसेच इतर सर्व तालुक्यामध्ये EFMS प्रणाली सुरु करण्याची सर्व पूर्व तयारीपूर्ण झालेली असून 1 नोव्हेंबर 2013 पासून सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये EFMS प्रणालीचा यशस्वी वापर सुरु करण्यात येणार आहे.
1. प्रस्तावना
2. सन २०१०-११
3. सन २०११-१२
4. सन २०१२-१३
5. सन २०१३-१४
6. ई मस्टर
7. इलेक्ट्रॉनिक फंड मॅनेजमेंट सिस्टीम
0 comments: