11 December 2015

राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला किसान सशक्तीकरण

राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला किसान सशक्तीकरण परियोजना -

महिला किसान सशक्तीकरण परियोजनेअंतर्गत केंद्र शासनाने दि. 7 जानेवारी, 2011 अन्वये मार्गदर्शक सूचना विहित केल्या आहेत. सदर योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांचा दर्जा उंचावणे, ग्रामीण भागातील महिलांना शाश्वत कृषी क्षेत्रातील जीवनमानाच्या संधी उपलब्ध करुन देणे, या महिलांच्या कृषी तसेच अकृषी क्षेत्रातील कौशल्य व क्षमतेमध्ये वाढ करणे, या महिलांचा शासकीय तसेच शासनाच्या इतर संस्थांशी संपर्क करुन देणे आणि या महिलांना कुटुंब व समाज स्तरावर खाद्य व पोषण सुरक्षा देणे हा आहे. हे करीत असताना त्यांच्यातील कौशल्याचा विकास करणे, त्यांच्यातील व्यवस्थापन क्षमता वाढविणे जेणेकरुन शेतीमध्ये बायोडायव्हरसिटीच्या व्यवस्थापनामध्ये याचा उपयोग होईल, याबाबतचा विचार या योजनेअंतर्गत करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत राबविण्यात येणारे प्रकल्प NGOs, CSOs, CBOs, SHG Federations, पंचायतराज संस्था किंवा इतर शासकीय संस्थामार्फत राबविण्यात येतात. या योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीचे प्रमाण हे 75% केंद्र शासनाचा हिस्सा, 25% राज्य शासनाचा हिस्सा व प्रकल्प राबविणारी संस्था असे असते. सदर योजनेअंतर्गत राज्यात बजरंग रीसर्च फाऊंडेशन, बीड व एम. एस. स्वामीनाथन, वर्धा हे प्रकल्प सुरू आहेत.




स्त्रोत : http://www.mahapanchayat.gov.in

SHARE THIS

Author:

0 comments: