03 January 2016

पोस्टाच्या सुरक्षित गुंतवणूक योजना

1.      नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट
2.      किसान विकास पत्र
3.      सुकन्या योजना
4.      मासिक उत्पन्न योजना
5.      सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम
6.      टाईम डिपॉझिट स्कीम (टीडीएस)
7.      सेव्हिंग अकाऊं
तुमचं आणि तुमच्या कुटुंबीयांच्या उत्तम भविष्यासाठी गुंतवणूक हा योग्य पर्याय आहे. पण, कुठे आणि कशी गुंतवणूक करावी? हा अनेकांना पडलेला प्रश्न असतो. याचंप्रश्नाचं उत्तम उत्तर आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणजे 'पोस्ट'...
यासाठी आम्ही तुम्हाला देतोय पोस्ट गुंतवणुकीच्या काही पर्यायांची माहिती... यामध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये सूट मिळतेच शिवाय गुंतवणुकीचे उत्तम रिटर्न्सही तुमच्या हाती पडतात.


नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट

ही एक फिक्स्ड डिपॉझिट स्कीम आहे. यामध्ये दीड लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असतं. या योजनेंतर्गत गुंतवणूक केल्यास ८.५ टक्के व्याज मिळतं. सहामहिन्यांनी व्याज जोडलं जातं. पाच वर्षांनंतर व्याजासहीत तुमचे पैसे तुमच्या हातात पडतात.

किसान विकास पत्र

१०० महिन्यांत (म्हणजेच ८ वर्ष आणि चार महिन्यांत) तुम्ही गुंतवलेली रक्कमेच्या दुप्पट पैसे तुमच्या हातात टेकवणारी ही योजना आहे.
कमीत कमी १००० रुपये भरून तुम्ही ही योजनासुरू करू शकता. १०००, ५०००, १०००० आणि ५०००० अशा गटांत तुम्ही पैसे भरू शकता. जास्तीत जास्त कितीही गुंवणूक तुम्ही करू शकता.

सुकन्या योजना



पोस्ट ऑफिसची ही स्कीम तुमच्या मुलींकरता आहे. यामध्ये, तुमच्या मुलीच्या नावावर तुम्ही खातं उघडू शकता. या योजनेत एका वित्तीय वर्षात तुम्ही १,००० ते १,५०,००० रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेत सद्य आर्थिक वर्षात ९.२ टक्के व्याज दिलं जातंय.


खातं उघडल्यानंतर १४ वर्षांपर्यंत तुम्ही पैसे जमा करू शकता. मुलगी जेव्हा २१ वर्षांची होईल तेव्हा तुम्ही पैसे काढून घेऊ शकता. शिवाय गरज लागलीच तर मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तुम्हाला अर्धे पैसे काढण्याचीही सूट दिली गेलीय. परंतु, १८ ते २१ वयात मुलीचं लग्न केलं तर हे खातं बंद करण्यात येईल.

मासिक उत्पन्न योजना



या योजनेंतर्गत तुम्हाला ८.४० टक्के दरानं व्याज मिळतं. परंतु, हा दर स्थिर नाही. या दरात दरवर्षी बदल होतो. सहा वर्षांत तुमचं अकाऊंट मॅच्युअर होतं. व्याजाचे पैसे प्रत्येक वर्षी तुमच्या अकाऊंटमध्ये जोडली जातात. या खात्यात कमीत कमी १५०० रुपये ठेवणं जरुरी आहे.

सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम




वयाची ६० वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तींसाठी ही योजना आहे. लाभार्थी पाच वर्षांसाठी आपलं सेव्हिंग अकाऊंट उघडू शकतो. यावर, शिल्लक असलेल्या रकमेवर ९ टक्के व्याज मिळतं. शिवाय, इन्कम टॅक्स अॅक्ट कलम ८० सी नुसार लाभार्थींना टॅक्समध्येही सूट मिळते.

टाईम डिपॉझिट स्कीम (टीडीएस)

टीडीएस ही योजना पाच वर्षांसाठी आहे. कमीतकमी २०० रुपये भरून ही योजना तुम्ही सुरू करू शकता. पहिली चार वर्ष ८.४ टक्के व्याज मिळतं. तर पाचव्या वर्षी ८.५ टक्के व्याज मिळतं. वार्षिक रुपातव्याज मिळतं. योजनेत मिळणारं व्याज (उत्पन्न) संपूर्णत: करमुक्त असतं.

सेव्हिंग अकाऊंट



पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं उघडणाऱ्या लाभार्थ्यांना वार्षिक ४ टक्क्यांनी व्याज दिलं जातं. केवळ २० रुपये भरून कोणतीही व्यक्ती आपलं सेव्हिंग अकाऊंट उघडू शकते.


आवर्ती (रिकरिंग) खात्यात मात्र ८.४ टक्केव्याज दिलं जातं. ही योजना एप्रिल २०१४ पासून लागू करण्यात आलीय. प्रत्येक महिन्याला कमीत कमी १० रुपयांनी ही योजना तुम्ही सुरू करू शकता. जास्तीतजास्त रकमेची मात्र मर्यादा नाही. ही योजना पाच वर्षांसाठी आहे. या योजनेत तुम्हाला वार्षिक ८.४ टक्के व्याज मिळतं.

अधिक माहितीसाठी आपण




SHARE THIS

Author:

0 comments: