30 December 2016

मत्स्यसंवर्धन विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणा-या योजना.

मत्स्यसंवर्धन विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणा-या योजना.


केंद्र पुरुस्कृत योजना

मत्स्यसंवर्धक विकास यंत्रणांची स्थापना - ७५ टक्के केंद्र पुरस्कृत

गोडया पाण्यातील निवडक तलाव सघन मत्स्यसंवर्धनाखाली आणणे, मच्छिमारांना प्रशिक्षित करून मत्स्योत्पादन वाढविणे व मत्स्यसंवर्धनाच्या बाबींवर अर्थसहाय उपलब्ध करून देणे तसेच मत्स्योत्पादन ते मत्स्यविक्री यांत समन्वय साधणे या उद्देशाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये मत्स्यसंवर्धक विकास यंत्रणांचीस्थापना कण्यात आलेली आहे.

मत्स्यसंवर्धन विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणा-या योजना.

25 December 2016

मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र भरती POST 50

मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र भरती POST 50

मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांच्या निवडीसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागणी करण्यात येत आहेत.


मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवरील व त्यांच्या आधिपत्याखालील विविध पदांच्या सरळसेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून लेखी परिक्षेसाठी विहीत नमुन्यात दि.24/12/2016 पासुन दि. 14/01/2017 पर्यतं (सायंकाळी 06.00 वा.पर्यतं ) (शासकीय सुटीचे दिवस धरुन) अर्ज ओनलाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत. 


Name of post:-  

  1. सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी
  2. यांत्रिकी निदेशक
  3. सांख्यिकी सहाय्यक
  4. कनिष्ठ लिपीक

Location:- महाराष्ट्र 

Last Date:- 14/01/2017

Posts:- 50 Posts 

Age Limit:- 18 Year More than 38. 






View the advertisement

24 December 2016

निमखारे पाण्यांतील मत्स्यसंवर्धन विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणा-या योजना

निमखारे पाण्यांतील मत्स्यसंवर्धन विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणा-या योजना

निमखारे पाण्यांतील मत्स्यसंवर्धन विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणा-या योजना.


निमखारे पाण्यांतील मत्स्यसंवर्धक विकास यंत्रणांची स्थापना - ७५ टक्के केंद्र पुरस्कृत
निमखारे पाण्याखालिल क्षेत्र विकसित करुन निमखारे पाण्याखालिल तलाव सघन मत्स्यसंवर्धनाखाली आणणे, मच्छिमारांना प्रशिक्षित करून मत्स्योत्पादन वाढविणे व मत्स्यसंवर्धनाच्या बाबींवर अर्थसहाय उपलब्ध करून देणे तसेच मत्स्योत्पादन ते मत्स्यविक्री यांत समन्वय साधणे या उद्देशाने प्रत्येक सागरी जिल्ह्यामध्ये निमखारे पाण्यांतील मत्स्यसंवर्धक विकास यंत्रणांची स्थापना कण्यात आलेली आहे. यंत्रणेमार्फत कोळंबी संवर्धकांना जागेची निवड करण्यासाठी प्रत्यक्ष प्रशिक्षण मेळावे, चर्चासत्राद्वारे प्रगत तंत्र सामान्य लाभार्थी पर्यंत पोचविण्याचे कार्य केले जाते. तसेच कोळंबी संवर्धन प्रकल्पासाठी बँकेकडून कर्ज मिळविण्यासठी शिफारस केली जाते.
सागरी जिल्ह्यामध्ये प्रस्तुत यंत्रणेमार्फतच मत्स्यसंवर्धक विकास यंत्रणे मार्फत राबविण्यात येणारे भुजल क्षेत्रासाठीचे कार्यक्रम राबविण्यात येतात.
या यंत्रणांचे अध्यक्ष संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व सदस्य सचिव संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय हे असता.

मत्स्यसंवर्धन विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणा-या योजना.


बाब
दर
परिमाण
मर्यादा
अभिप्राय
तलाव बांधकाम (निमखारे)
६०,०००/-
हेक्टर
-

७५,०००/-
हेक्टर
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीस
तलावाचे नुतनिकरण
१५,०००/-
हेक्टर
-

१८,०००/-
हेक्टर
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीस


तटीय जलकृषी प्राधिकरण अधिनियम २००५ मधिल तरतूदींचे आधिन राहून तलाव बांधकाम करणे बंधनकारक आहे.

22 December 2016

Factory Renewed कारखाना नूतनीकरण

Factory Renewed कारखाना नूतनीकरण

Factory Renewed कारखाना नूतनीकरण

 



ओळखीचा पुरावा (किमान -1)


·         1) PAN card

·         2) Passport

·         3) Aadhar Card

·         4) Driving License

·         5) Election / Voters ID

अनिवार्य कागदपत्रे(सर्व अनिवार्य)


·         1) Plan Approval letter

·         2) Previous Factory License

·         3) Registration Certificate

 

21 December 2016

टोल फ्री क्रमांक

टोल फ्री क्रमांक

एक चांगला मेसेज  
Please save n also forward
  टोल फ्री क्रमांक ☎ 

  रूग्णवाहिका-१०२/१०८ 
♨अग्निशामक-१०१  
पोलीस-१००  
रेल्वे १३९  
एस.टी.-१८००२२१२५०     
अन्नसुरश्रा-१८००२२२२६२ 
अल्पसंख्याक-१८००२२५७८६   
आधार-१८००१८०१९४७
आयकर-१८००२२०११५
आरोग्य विमा-१८००११३३०० 
कायदा उल्लंन-१८००११०४५६
शेतकरी कॉल -१८००१८०१५५१
कृषी विद्यान-१८००२३३३३२३३
☁खत-१८००२३३४०००
गँस-१८००२३३३५५५
चाईल्डलाईन-१०९८
जागो ग्राहक-१८००१८०४५६६
ग्राहक मंच-०२२४०२९३००
जिवनदायी आरोग्य योजना-१८००२३३२२००
तंबाखु-०२०२४४३०११३
नरेगा-१८००२६७६००१
पणन विभाग-१८००२३३०२४४
बारटी -१८००२३३०४४४
मतदार नोंदणी-१८००२२१९५०
महावितरण-१८००२००३४३५ ,१८००२३३३३४३५
महिला तक्रार-१०९१
मोबाईल तक्रार-१५५२२३
यशदा-१८००२३३३४५६
रेल्वे तक्रार-१८००२३३२५३४
लाचलूचपत-१०६४
वनविभाग-१५५३२४
समाजसेवा मंच -०२०२७१२०७१३       
सामाजिक न्याय-१८००२३३११५५
स्ञी भ्रृणहत्या-१८००२३३४४७५
स्वस्तधान्य-१८००२२४९५०
स्वाईन फ्लु-१८००११४३७७
104 हा क्रमांक रक्त पुरवठा क्रमांक असेल.
 महाराष्ट्र शासनाने नुकतीच ही
 सेवा सुरू केली आहे.या  क्रमांकावर फोन
 केल्यास 40 किमी पर्यंत गरजवंताला एका तासाच्या आत आवश्यक
 रक्तचा पुरवठा केला जाईल. हा सन्देश
  जास्तीत जास्त शेयर करा. या सुविधेची माहिती द्या, एखाद्याचे प्राण वाचवा.

20 December 2016

 प्रसार भारती मध्ये मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) पदांच्या 33 जागां

प्रसार भारती मध्ये मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) पदांच्या 33 जागां

प्रसार भारती मध्ये
मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) पदांच्या 33 जागांसाठी पात्र अपंग उमेदवारांकडून दि. 23 जानेवारी 2017 पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

  वेबसाईट लिंक अधिकमाहिती

जलसंपदा विभागातील नांदेड उर्ध्व पेनगंगा प्रकल्प मंडळ

जलसंपदा विभागातील नांदेड उर्ध्व पेनगंगा प्रकल्प मंडळ


नांदेड उर्ध्व पेनगंगा प्रकल्प मंडळ येथे कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, वरिष्ठ लिपीक, लिपीक व टंकलेखक, वाहनचालक, शिपाई, चौकीदार इ. पदांच्या भरतीसाठी 
फक्त जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त कर्मचा-यांकडून 
दि. 10 जानेवारी 2017 पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.


More

17 December 2016

Right to Information Movement

Right to Information Movement

शासकीय किंवा निमशासकीय तसेच खासगी कार्यालयांच्या कामकाजात जास्तीत जास्त पारदर्शकता यावी आणि सर्वसामान्य नागरिकांना कार्यालयातील कामकाजाची माहिती व्हावी, अधिकृत कागदपत्रे मिळावीत या उद्देशाने माहितीच्या अधिकाराचा कायदा करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य  स्तरावर माहिती आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी  या संदर्भात वेळोवेळी दिलेला लढाही माहितीच्या अधिकारासाठी महत्वाचा ठरला आहे. आज विविध प्रसार माध्यमातून माहिती अधिकार कायद्याचा प्रचार झाला असला तरी ही माहिती नेमकी कोणाकडून आणि कशी मिळवावी, त्याबाबत सर्वसामान्य लोकांना अद्यापही नेमकी माहिती नाही.
                    माहितीच्या अधिकाराअंतर्गत कोणाकडून,कोणती आणि कशी माहिती मिळवायची, त्यासाठी अर्ज कुठे व कसा करायचा तसेच राज्यातील मुख्य माहिती आयुक्तांसह सर्व विभागीय माहिती आयुक्तांच्या कार्यालयाचे पत्ते व दूरध्वनीही येथे आहेत.

माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ न्यायालये, संसद, विधिमंडळ, महामंडळे, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद,पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, आर्थिक लाभ घेणार्‍या सहकारी किंवा खाजगी सेवाभावी संस्था, मंत्रालयातील विविध विभाग अशा कार्यालयांच्या कामकाजामध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होण्याच्या दृष्टीने माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ लागू करण्यात आला आहे. विविध कार्यालयातील कामकाजाची माहिती, कागदपत्रे नागरिकांना मिळवता यावी म्हणून, अशा अधिकाराची व्यवहार्य पद्धत आखून देण्याकरिता केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग स्थापन करण्यात आला आहे. माहिती मिळविण्याची इच्छा असणार्‍या नागरिकांना ती पुरविण्याकरिता तरतूद म्हणून या कायद्याची अंमलबजावणी केली आहे.
माहितीचा अधिकार माहितीचा अधिकार म्हणजे कोणत्याही कार्यालयाकडे असलेली किंवा त्यांच्या नियंत्रणात असलेली व या नियमानुसार मिळवता येण्याजोगी माहिती ! माहिती जाणून घेणे, आवश्यक कागदपत्रे मिळवणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असून तो मूलभूत अधिकार आहे. असा हा अधिकार २००५ या वर्षामध्ये सर्वांनाच मिळाला आहे. या अधिकाराचा वापर करुन परिसरात सुरु असलेल्या कामांची माहिती घेता येते. उदा. - न्यायालयातर्फे आवश्यक त्या निकालाची प्रत घेता येते. विधिमंडळाकडून मंत्रिपरिषदेच्या निर्णयाची प्रत घेता येते. शासकीय कार्यालयाकडून अहवाल, नमुने, प्रसिद्धी पत्रके आदी कागदपत्रांची झेरॉक्स घेता येते. सहकारी संस्थांकडून इतिवृत्त, निर्णयाच्या प्रती, आर्थिक व्यवहाराची माहिती घेता येते.
कोणाकडून घेऊ शकतो माहिती माहिती देणारी कार्यालये, संस्था यांनी आपल्या कामकाजाची माहिती स्वत:हून प्रसिद्ध करुन सूचना फलकावर लिहायची आहे. अथवा अशा माहितीची संचिका प्रत कार्यालयाच्या बाहेर जनतेसाठी ठेवायची आहे. त्यात कार्यालयाचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, कार्यालयाची वेळ, जनमाहिती अधिकार्‍यांची नावे, कार्यालयाची कामकाजाची पद्धत, उद्दिष्टे, कार्यालयात उपलब्ध असलेली माहिती, विविध अर्जांचे नमुने, कर्मचार्‍यांची नावे व इतर माहिती, उपलब्ध निधी, लाभार्थ्यांची यादी, योजनांची माहिती, योजनांवर अथवा लाभार्थ्यांवर झालेला खर्च, परिपत्रके, उपलब्ध प्रकाशने व त्याची किंमत, कर्मचार्‍यांचे वेतन, अंदाजपत्रक अशा प्रकारची माहिती वेळोवेळी अद्ययावत करावी. ही माहिती पुढील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्थामधून घेता येते.
1) न्यायालये (सर्व)2) संसद (लोकसभा व राज्यसभा)3) विधिमंडळ (विधानसभा/विधान परिषद), विविध महामंडळे 4) आयुक्त कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये,5) तहसील कार्यालये, जिल्हा परिषदा (अंतर्गत सर्व कार्यालये), 6) पंचायत समिती (अंतर्गत सर्व विभाग), ग्रामपंचायती 7) महानगरपालिका, नगरपालिका 8) गृह विभाग (पोलीस यंत्रणा)9) मंत्रालयीन विविध विभाग तथा सर्व शासकीय कार्यालये 10) शासकीय अनुदानित सहकारी, खाजगी, सेवाभावी संस्था उदा :- साखर कारखाने, खरेदी विक्री संघ, विविध कार्यकारी सोसायट्या, दूध संघ, सहकारी बँका. अशी मिळवा माहिती माहिती मिळविण्यासाठी अर्जदार हा कोर्‍या कागदावरसुद्धा जनमाहिती अधिकार्‍याकडे अर्ज करु शकतो. त्या अर्जावर १० रु. चा कोर्ट फी स्टॅम्प लावावा अथवा रोख रक्कम/डिमांड ड्राफ्ट/बँकर्स चेक द्यावा. अर्जदार दारिद्र्यरेषेखालील असेल तर कोणतेच शुल्क द्यावे लागणार नाही.
असा अर्ज सादर करताना पुढील १२ बाबींची पूर्तता करावी  1) कार्यालयाचे नाव 2) कार्यालयाचा पत्ता 3) अर्जदाराचे संपूर्ण नाव 4) अर्जदाराचा संपूर्ण पत्ता 5) माहितीचा विषय 6) कोणत्या कालावधीची माहिती हवी? 7) कोणत्या प्रकारची माहिती हवी? 8) माहिती, पोस्टाने की स्पीड पोस्टने हवी? 9) अर्जदार दारिद्र्यरेषेखालील आहे काय? (असल्यास रेशन कार्डाची झेरॉक्स जोडावी)10) अर्ज केल्याची तारीख 11) अर्ज केल्याचे ठिकाण 12) अर्जदाराची सही वा अंगठा संपूर्ण अर्ज भरुन झाल्यावर तो जनमाहिती अधिकार्‍याकडे सादर करावा. पोच घ्यावी. ३० दिवसांच्या आत माहिती मिळू शकते.
माहिती मिळण्याचा व अपिलाचा कालावधी जनमहिती अधिकार्‍याकडे अर्ज केल्यानंतर ३० दिवसांत माहिती मिळते. जनमाहिती अधिकार्‍याने माहिती नाकारल्यास किंवा समाधान न झाल्यास अपील करण्याचा कालावधी ३० दिवसांचा आहे. अपिलीय अधिकार्‍याने माहिती नाकारल्यास किंवा समाधान न झाल्यास ९० दिवसांत राज्य माहिती आयुक्ताकडे द्वितीय अपील करता येते.
माहितीसाठीच्या कागदपत्रांचा खर्च दस्तऐवजाचे वर्णन खर्च विविध कागदपत्रांची झेरॉक्स एका पानास रु. २ आवश्यक माहितीची सीडी किंवा फ्लॉपी प्रत्येकी ५० रु. कार्यालयातील कागदपत्रे पहायची असल्यासपहिल्या तासासाठी खर्च नाही. तासाभरापेक्षा अधिक वेळ पहायची असल्यास-प्रत्येक तासासाठी ५ रु. आवश्यक माहिती पोस्टाने हवी असल्यास -पोस्टाचा खर्च द्यावा लागतो अर्जदार दारिद्र्यरेषेखालील असेल तर- खर्च लागत नाही.

१)अर्जदाराने मागितलेली माहिती अपूर्ण, चुकीची, दिशाभूल करणारी असेल किंवा माहिती नाकारल्यास संबंधित अर्जदारास जनमाहिती अधिकार्‍याविरुद्ध अपिलीय अधिकार्‍यांकडे अपील करता येते. हे अपील ३० दिवसांच्या आत करता येते. हा अपिलीय अधिकारी जनमाहिती अधिकार्‍यापेक्षा अधिक अनुभवी असणारा, कामाच्या सर्व बाबी माहिती असलेला असतो. त्याने अनुभवाचा व अधिकाराचा वापर नि:पक्षपातीपणे करावयाचा असतो.
२) अपिलासाठी अर्ज सादर करताना कागदावर २० रुपयांचा न्यायालय मुद्रांक चिकटवावा. अर्जावर नांव, पत्ता, जनमाहिती अधिकार्‍याचा तपशील द्यावा. त्यात कोणती अपेक्षित माहिती मिळाली नाही याचा उल्लेख करावा. एकूणच तक्रारीचे स्वरुप/अपिलाचे कारण स्पष्टपणे लिहावे. शेवटी सही करुन अर्ज दाखल करावा. अर्जाची पोच घ्यावी.
३) अपिलीय अधिकार्‍याकडे अपील दाखल केल्यावर अर्ज केल्याच्या दिनांकापासून ४५ दिवसांच्या आत माहिती मिळू शकते. दुसरे अपील का, कसे करावे? १) अर्जदाराने मागितलेली माहिती अपिलीय अधिकार्‍याकडूनही न मिळाल्यास किंवा चुकीची, अर्धवट मिळाल्यास, समाधान न झाल्यास अर्जदार हा दुसरे अपील राज्य माहिती आयुक्तांकडे ९० दिवसाच्या आत करु शकतो.
२) दुसरे अपील करताना पुन्हा पहिल्या अपिलाच्या अर्जाप्रमाणे कृती करावी. अर्जावर २० रुपयांचा मुद्रांक चिकटवून नांव, पत्ता अपिलीय अधिकार्‍याचा तपशील, प्रारंभीच्या जनमाहिती अधिकारी व अपिलीय अधिकार्‍याकडून मिळालेली माहिती व अर्जदाराला अपेक्षित असलेल्या माहितीचा तपशील स्पष्टपणे लिहावा.
३) राज्य माहिती आयुक्त अशा अर्जाची तपासणी करतात. गरज वाटल्यास संबंधित कार्यालयाच्या अधिकार्‍यांना समक्ष बोलावतात किंवा गरज वाटल्यास अर्जदारालाही बोलावतात. त्यानंतर राज्य माहिती आयुक्त निर्णय देतात. त्यांनी दिलेला निर्णय मात्र संबंधितांवर बंधनकारक असतो.
माहिती नाकारल्यास दंड 
१) जनमाहिती अधिकार्‍याने वेळेत माहिती दिली नाही. जाणीवपूर्वक नाकारली, किंवा चुकीची, अपूर्ण, दिशाभूल करणारी माहिती दिली किंवा माहितीच नष्ट केली तर, व असे आयोगाचे मत झाल्यास, गुन्हा करणार्‍या माहिती अधिकार्‍यास २५० रु. दंड प्रत्येक दिवसाला केला जातो. मात्र एकूण दंडाची रक्कम २५ हजारांपेक्षा अधिक लादता येत नाही.
२) राज्य माहिती आयोगामार्फत जेव्हा गुन्हा केलेल्या जन माहिती अधिकार्‍याला दंड केला जातो तत्पूर्वी त्याला आपले म्हणणे पुराव्यासह मांडण्याची संधी दिली जाते. अशावेळी आयोग दंडाबाबत योग्य तो निर्णय घेऊ शकतो. 

वर दिलेला QR CODE स्कॅन करा आणि statemaharashtra अप्प Download करा


Right to Information Act माहितीचा अधिकार

Right to Information Act माहितीचा अधिकार

माहितीचा अधिकार  कायदा २००५ म्हणजे काय?
सरकारी कामांमध्ये पारदर्शकता आणून भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी, तसंच लोकांना हवी ती माहिती उपलब्ध करून खरी लोकशाही राबवण्याच्या हेतूने माहितीचा अधिकार कायदा २००५ अस्तित्वात आला.

 केंद्र सरकार, संघराज्य-क्षेत्र प्रशासन, राज्यप्रशासन यांच्या नियंत्रणाखालील शासकीय, निमशासकीय कार्यालय तसेच सरकारकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या निधी पुरवल्या जाणाऱ्या अशासकीय संस्था, मंत्रालय, महानगरपालिका, नगरपालिका, कलेक्टर, रेल्वे, न्यायालये, एस.टी., वीज वितरण कंपनी, रेशनिंग कार्यालय, ग्रामपंचायत, तहसील, पोलीस, शाळा, महाविद्यालय, पासपोर्ट, इन्कम टॅक्स, प्रॉविडण्ट फंड, म्हाडा, पोर्ट ट्रस्ट, पोस्ट इत्यादी कार्यालयांतून या कायद्यांतर्गत माहिती मागवता येते.

माहिती म्हणजे काय?
माहिती म्हणजे कोणत्याही सरकारी विभागातील सर्व प्रकारचे दफ्तर, कागदपत्रे, टिपण, ई-मेल, एखाद्या अधिकाऱ्याने स्वत: नमूद केलेले मत, लिखित स्वरूपातला आदेश, वर्तमानपत्राद्वारा प्रसिद्ध केलेली माहिती, परिपत्रक, अध्यादेश, नोंदवही, कोणताही लिहिलेला कागद, कच्चे टिपण, मेमो, पत्रव्यवहार तसंच खासगी संस्थ- कंपन्यांकडून सरकार मिळवू शकणारी माहिती.

वरील माहिती आपण नागरिक छायांकित प्रतीच्या स्वरुपात, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अथवा छापील स्वरूपात मिळवू शकतो. तसंच सरकारी कामाची, अभिलेखांची, कागदपत्रांची पाहणी व तपासणी करू शकतो.

या कायद्याचा सामान्य लोकांना उपयोग काय?
सजग नागरिक म्हणून या अधिकाराचा वापर करून अनेक सामाजिक तसेच वैयक्तिक बाबींमधील भ्रष्टाचार उघडकीस आणण्यास योग्य ती माहिती मिळविता येते. या अधिकारातंर्गत आपल्या घरी गॅस सिलेंडर वेळेवर येत नसेल तर हिंदुस्तान पेट्रोलियमलाच- आमच्या भागातील डीलरला किती गॅस सिलेंडर देता? आमचे बुकींग कधी झाले? घरी गॅस कधी दिला? इतर लोकांना गॅस कधी आणि किती दिले? हे प्रश्न विचारू शकता. यातून सिलेंडरची अनाधिकृत विक्री कोठे व कशी केली जात आहे याचा सुगावा लागतो. तसेच या महितीद्वारे तक्रार नोदंवून अशा प्रकारचा भ्रष्टाचार रोखण्यास मदत होते.   

माहिती म्हणजे नक्की काय?
माहिती म्हणजे नोंदी, कागदपत्रे, शेरे, मेमो, ई-मेल्स, सल्ले, मते, प्रसिद्धीपत्रके, आदेश,परिपत्रके, रोजनिशी, करारनामा, अहवाल, कागद, उदाहरणे, नमुने या आणि अशा स्वरूपातील कोणतेही साहित्य तसेच ईलेक्ट्रॉनिक माध्यमात असलेली कोणत्याही स्वरूपाची खासगी माहिती, जी प्रचलित कायद्यातील तरतूदीनुसार सार्वजनिकप्राधिकरणास जाणुन घेण्याचा अधिकार आहे.
* मात्र यांत फाईलींवर मारलेल्या शेर्‍यांचा समावेश होत नाही.

माहितीचा अधिकार म्हणजे काय ?
या अधिकारात खालील बाबींचा समावेश आहे:
• काम, कागदपत्रे, नोंदी यांची तपासणी करणे • कागदपत्रे किंवा नोंदी यांच्या प्रमाणित प्रती मिळवणे तसेच त्यांची टिपणे काढणे. • साहित्याच्या प्रमाणित प्रती मिळवणे • माहिती छापील प्रत (प्रिंटआऊटस्), सीडी, फ्लॉपी, टेप्स, व्हिडिओ रेकॉर्डस् किंवा इतर कोणत्याही ईलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मिळवणे.

या कायद्यात माहिती नेमकी कोणत्या स्वरुपाची घेता येते ?
 माहितीचा अधिकार म्हणजे कोणत्याही कार्यालयाकडे असलेली किंवा त्यांच्या नियंत्रणात असलेली व या नियमानुसार मिळवता येण्याजोगी माहिती ! माहिती जाणून घेणे, आवश्यक कागदपत्रे मिळवणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असून तो मूलभूत अधिकार आहे. असा हा अधिकार २००५ या वर्षामध्ये सर्वांनाच मिळाला आहे. या अधिकाराचा वापर करुन परिसरात सुरु असलेल्या कामांची माहिती घेता येते. उदा. कार्यालयाचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, कार्यालयाची वेळ, जनमाहिती अधिकार्‍यांची नावे, कार्यालयाची कामकाजाची पद्धत, उद्दिष्टे, कार्यालयात उपलब्ध असलेली माहिती, विविध अर्जांचे नमुने, कर्मचार्‍यांची नावे व इतर माहिती, उपलब्ध निधी, लाभार्थ्यांची यादी, योजनांची माहिती, योजनांवर अथवा लाभार्थ्यांवर झालेला खर्च, परिपत्रके, उपलब्ध प्रकाशने व त्याची किंमत, कर्मचार्‍यांचे वेतन, अंदाजपत्रक अशा प्रकारची माहिती घेता येते.

जन माहिती अधिकारी म्हणजे कोण?
 हे अधिकारी सर्व प्रशासकीय खात्यांत किंवा कार्यालयांत सार्वजनिक अधिकार्यांद्वारे नेमण्यात आलेले असतात. ते नागरीकांना त्यांनी मागितलेल्या माहितीनुसार माहिती देण्याचे काम करतात. या कामासाठी जर ते सहाय्यकाची मदत घेत असतील तर अशा व्यक्तीसही जन माहिती अधिकारी म्हणुन वागवले जाते.

कोणा कडून माहिती घेता येणार नाही ?
राष्ट्राच्या संरक्षणाच्या दॄष्टीने संवेदनाशील क्षेत्र, व्यक्तीगत स्वरुपाची, खाजगी कंपनी, विनाअनूदानीत संस्था,खाजगी विद्यूत पुरवठादार कंपनी इ. कडून या कायद्याच्या आधारे माहिती मागता येत नाही.

1 ज्यामुळे भारताची सार्वभौमता आणि एकात्मता, सुरक्षा,वैज्ञानिक किंवा आर्थिक बाबी,परराष्ट्रीय संबंध आदींना धोका पोहोचणार असेल किंवा ज्यामुळे एखाद्या गुन्ह्याला प्रोत्साहन मिळू शकते अशी कोणतीही माहिती.
2 कोणत्याही न्यायालयाने जी माहिती प्रसिद्ध करण्यास नकार दिला आहे किंवा जी माहिती दिल्याने न्यायालयाचा अवमान होईल अशी कोणतीही माहिती.
3 जी माहिती उघड केल्याने संसद किंवा विधीमंडळाच्या स्वातंत्र्याला बाधा येईल अशी माहिती.
4 व्यावसायिक गोपनीयता,व्यापारी गुपिते किंवा बुद्धीजीवी मालमत्ता यांचा समावेश,असणारी माहिती जी उघड केल्याने तिसर्या पक्षाच्या स्पर्धात्मक स्थानाला धक्का पोहोचू शकतो. अर्थात सदर माहिती उघड करण्यास प्रतिस्पर्धी पक्षाची हरकत नसल्यास ही माहिती उघड केली जाऊ शकते.
5 एखाद्या व्यक्तीच्या विश्वसनीय नात्यांमधुन मिळालेली माहिती. मात्र माहिती उघड करण्यास प्रतिस्पर्धी पक्षाची हरकत नसल्यास ही माहिती उघड केली जाऊ शकते.
6 परराष्ट्र सरकारकडून मिळवलेली माहिती. जी माहिती उघड केल्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो अथवा ज्यामुळे एखाद्या कायद्याची अंमलबजावणी करण्यास गुप्तपणे मदत करणार्या व्यक्तीवे नाव उघड होऊ शकते किंवा सुरक्षेच्या कारणांस्तव असलेली माहिती.
7 ज्यामुळे शोधकार्यात किंवा आरोपींवरील कारवाईत अडथळा निर्माण होऊ शकतो अशी माहिती.
8 मंत्रीमंडळ,सचिव आणि इतर अधिकारी यांच्यात होणार्या चर्चेचे तपशील व इतर कॅबिनेट कागदपत्रे.
9 जिचा सामाजिक कार्याशी अथवा जनहिताशी काहीही संबंध नाही अशी वैयक्तीक माहिती किंवा जी उघड केल्याने एखाद्या व्यक्तीच्या एकांताचा भंग होऊ शकतो किंवा त्याच्या खाजगी आयुष्यावर आक्रमण होऊ शकते अशी कोणतीही माहिती.
10 मात्र एखाद्या घटनेत व्यक्तीला अथवा पक्षाला होणारा त्रास जनहिताच्या तुलनेत कमी महत्त्वाचा असेल तर अशी माहिती उघड केली जाऊ शकते.

अर्ज कसा करावा?
• जनमाहिती अधिकार्याकडे इंग्लिश, हिंदी किंवा त्या राज्याच्या अधिकृत भाषेत लेखी किंवा ईलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे आपल्या हव्या असलेल्या माहितीचा तपशील असणारा अर्ज सादर करावा
• माहिती मिळवण्या मागील कारण स्पष्ट करणे अर्जदारावर बंधनकारक नाही.
• ठरवून दिलेली फी भरावी.

माहिती मिळवण्यासाठी काही खर्च येतो का ?
 होय, माहितीसाठीच्या कागदपत्रांचा खर्च पुढील प्रमाणे येतो. मात्र अर्जदार दारिद्र्यरेषेखालील असेल तर- खर्च लागत नाही.
कागदपत्रांचा खर्च :- दस्तऐवजाचे वर्णन खर्च
विविध कागदपत्रांची झेरॉक्स एका पानास रु. २
आवश्यक माहितीची सीडी किंवा फ्लॉपी प्रत्येकी ५० रु.
कार्यालयातील कागदपत्रे पहायची असल्यासपहिल्या तासासाठी खर्च नाही.
तासाभरापेक्षा अधिक वेळ पहायची असल्यास-प्रत्येक तासासाठी ५ रु.
आवश्यक माहिती पोस्टाने हवी असल्यास -पोस्टाचा खर्च द्यावा लागतो.
अर्जदार या फीचे पुर्नतपासणी करण्यासाठी योग्य त्या समितीकडे अपील करू शकतो.

• जर जनमाहिती अधिकारी ठरवून दिलेल्या वेळेत माहिती देण्यास अयशस्वी ठरल्यास त्याने ती माहिती अर्जदारास विनामुल्य देणे बंधनकारक आहे.

अर्जदाराने अपील कसे करावे?
१)अर्जदाराने मागितलेली माहिती अपूर्ण, चुकीची, दिशाभूल करणारी असेल किंवा माहिती नाकारल्यास संबंधित अर्जदारास जनमाहिती अधिकार्‍याविरुद्ध अपिलीय अधिकार्‍यांकडे अपील करता येते. हे अपील ३० दिवसांच्या आत करता येते. हा अपिलीय अधिकारी जनमाहिती अधिकार्‍यापेक्षा अधिक अनुभवी असणारा, कामाच्या सर्व बाबी माहिती असलेला असतो. त्याने अनुभवाचा व अधिकाराचा वापर नि:पक्षपातीपणे करावयाचा असतो. अपील असे करावे :
1) अपिलासाठी अर्ज सादर करताना कागदावर २० रुपयांचा न्यायालय मुद्रांक चिकटवावा.
2) अर्जावर नांव, पत्ता, जनमाहिती अधिकार्‍याचा तपशील द्यावा. त्यात कोणती अपेक्षित माहिती मिळाली नाही याचा उल्लेख करावा. एकूणच तक्रारीचे स्वरुप/अपिलाचे कारण स्पष्टपणे लिहावे.
3) शेवटी सही करुन अर्ज दाखल करावा. 4) अर्जाची पोच घ्यावी.
अपिलीय अधिकार्‍याकडे अपील दाखल केल्यावर अर्ज केल्याच्या दिनांकापासून ४५ दिवसांच्या आत माहिती मिळू शकते.

दुसरे अपील कसे करावे ?
अर्जदाराने मागितलेली माहिती अपिलीय अधिकार्‍याकडूनही न मिळाल्यास किंवा चुकीची, अर्धवट मिळाल्यास, समाधान न झाल्यास अर्जदार हा दुसरे अपील राज्य माहिती आयुक्तांकडे ९० दिवसाच्या आत करु शकतो. दुसरे अपील असे करावे :
1) अपिलासाठी अर्ज सादर करताना कागदावर २० रुपयांचा न्यायालय मुद्रांक चिकटवावा.
2) अर्जावर नांव, पत्ता, जनमाहिती अधिकार्‍याचा तपशील द्यावा. त्यात कोणती अपेक्षित माहिती मिळाली नाही याचा उल्लेख करावा. एकूणच तक्रारीचे स्वरुप/अपिलाचे कारण स्पष्टपणे लिहावे.
3) शेवटी सही करुन अर्ज दाखल करावा.
4) अर्जाची पोच घ्यावी.



माहितीचा अधिकार अधिनियम अर्ज कसा असावा

माहितीचाअधिकार अधिनियम अर्ज कसा असावा ?

माहितीचाअधिकार अधिनियम अर्ज कसा असावा ?

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहिती मिळविण्यासाठी विनंती 
  • तुम्ही माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये कोणत्या ही सार्वजनिक आस्थापनांकडून
  •  (सरकारी संस्था किंवा सरकारी अनुदानप्राप्त संस्था) माहिती मिळवू शकता.
  • यासाठी लागणारा अर्ज हस्तलिखित असू शकतो किंवा टाईप केलेला असू शकतो. हा अर्ज माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वेबसाईट वरून डाउनलोड करता येतो.
  • अर्ज इंग्रजी, हिंदी किंवा संबंधित राज्याच्या अधिकृत भाषेत असावा.
    तुमच्या अर्जात खालील माहिती पुरवा:
  1.         सहाय्यक लोकमाहिती अधिकारी/लोकमाहिती अधिकार (पीआयओ) यांचे नाव व पत्ता
  2.         विषय: माहितीचा अधिकार अधिनियम २००५, सेक्शन ६ (१) अन्वये माहिती मिळविण्यासाठी अर्ज
  3.         तुम्हाला त्या संस्थेकडून/प्राधिकरणाकडून हवी असलेली विशिष्‍ट माहिती
  4.         अर्जदाराचे नांव
  5.         वडिलांचे/पतीचे नांव
  6.         वर्ग: अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/इतर मागासवर्गीय, इ.
  7.         अर्ज फी
  8.         तुम्ही दारिद्र्यरेषेखालील कुटुंबापैकी आहात का? हो/नाही
  9.         पत्रव्यवहाराचा पत्ता (मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी आवश्‍यक नाहीत)
  10.         तारीख आणि स्थळ
  11.         अर्जदाराची सही
  12.         सोबत जोडलेल्या कागदपत्रांची यादी
  •     अर्ज करण्यापूर्वी सहाय्यक लोकमाहिती अधिकारी/लोकमाहिती अधिकारी यांचे नाव व पत्ता, उल्‍लेख केलेली फी व फी देण्याची पद्धत पुन्हा एकदा तपासून पहा.
  •     माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळविण्यासाठी फी आकारण्याची तरतूद कायद्यात आहे मात्र अनुसूचित जाती जमातीआणि दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींकडून फी आकारण्यात      येत नाही.
  •     ज्यांना फीमाफी हवी असेल त्यांनी अर्जासोबत अनुसूचित जाती/जमाती/दारिद्र्यरेषेखाली असल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
  •     अर्ज स्वतः जाऊन/पोस्टाने किंवा ई-मेलद्वारे दाखल करता येतो जर तुम्ही अर्ज पोस्टाने पाठवत असाल तर नेहमी रजिस्टर पोस्टाचाच वापर करा. खाजगी कोरियर सेवा वापरणे सदैव टाळा. 
  •     तुमच्या संदर्भासाठी अर्जाच्या (मुख्य अर्ज, फी भरल्याचा पुरावा,सोबत जोडलेली कागदपत्रे, पोस्टाने अर्ज पाठवल्याचा पुरावा, इ.) दोन (2) छायांकित प्रती तयार करा व सुरक्षितपणे ठेवा.
  •     जर तुम्ही अर्ज स्वहस्ते दाखल करणार असाल, तर एक पोचपावती तयार करा व त्यावर संबंधित कार्यालयाचा तारखेनिशी सही- शिक्का घ्या. जर अर्ज रजिस्टर पोस्टाने पाठवणार असाल तर ही पोचपावती अर्जासोबत जोडा आणि पोस्टाची अर्ज पाठवल्याची पावती व्यवस्थित जपून ठेवा.
  •     लोकमाहिती अधिकार्‍याला अर्ज मिळाल्यापासूनच्या दिवसापासून अर्जावर कार्यवाही करून माहिती पुरविली जाते