02 December 2015

यशवंत ग्राम समृध्द योजना

1.     यशवंत ग्राम समृध्द योजना
2.     योजनेबाबतचा तपशिल :
यशवंत ग्राम समृध्द योजना
योजनेचे नांव : यशवंत ग्राम समृध्दी योजना
योजनेचे स्वरुप : राज्यस्तरीय योजना


योजनेबाबतचा तपशिल :

यशवंत ग्राम समृध्दी योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गावातील योजनेमध्ये गावक-यांचा सहभाग वाढवून निर्णय प्रक्रियेत त्यांना सक्रीय करुन घेणे गावाची गरज लक्षात घेवून कामाचे नियोजन करणे, ग्रामसभेचे महत्व वाढविणे, लोकवर्गणीद्वारे निधी उपलब्ध करणे, गावामध्ये लोकांच्या सहभागातून ग्राम समृध्दी करावी असा आहे.
ग्रामीण भागातील गावांचा विकासकरण्यासाठी ग्रामसभेच्या मान्यतेने आवश्यक कामांची निवड करुन गावांमध्ये लोकसहभागातून पायाभूत सुविधा निर्माण करुन गावांची समृध्दी करण्याच्या उद्देशाने शासनाने सन 2002 पासुन यशवंत ग्राम समृध्दी योजनाराज्यात सुरु केली. या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीकडून सद्यस्थितीत दलित / आदिवासी वस्तीसाठी 10%आणि सर्वसाधारण वस्तीसाठी 15% लोकवर्गणी निश्चित केली आहे. ग्रामपंचायतीला दरवर्षी रु.10.00 लक्ष एवढया किंमतीचे विकासाचे काम करता येते. या योजनेंतर्गत प्रामुख्याने खालील कामे घेण्यात येतात-
  • पंचायत राज संस्थांच्या शाळांसाठी शाळा इमारती, किंडांगणे, काटेरी ताराशिंवाय कुंपणे
  • अंगणवाडी इमारती
  • ग्रामपंचायत कार्यालये (सर्व शासकीय कर्मचा-यांच्या कार्यालयासहीत)
  • गावांतर्गत रस्ते व गटारे
  • दहन व दफन भूमी
  • बस थांबा शेड
  • गाव व वाडयांच्या रस्त्यांवरील विद्युतीकरणाची कामे
  • वाचनालय, व्यायामशाळा, सार्वजनिक सभागृहे
  • लघुसिंचन कामे
  • होडया व वाहतुक माध्यमे खरेदी
  • पाळणा घरे व डे केअर सेंटर्स
  • दुरुस्ती व देखभाल
  • अन्य कोणतेही काम

सदर योजनेस ग्रामीण भागातून प्रचंड प्रतिसाद प्राप्त झाल्याने सन 2006 मध्ये जिल्हयांकडून मोठया प्रमाणात निधीची मागणी प्राप्त झाली, परंतू शासनस्तरावर आपु-या निधी उपलब्धतेमुळेसंबंधीत जिल्हयांना पुरसा निधी उपलब्ध करुन देणे शक्य झाले नाही. त्यामुळे सन 2006-07 मध्ये दि.1 एप्रिल 2006 पासुन पुढील आदेश होईपर्यंतग्रामपंचायतींकडून लोकवर्गणी घेण्यात येऊ नये असा तात्पुरत्या स्वरुपात निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून ते आतापर्यंत सदर योजना पूर्ववत सुरु झालेली नाही. ही योजना सुधारीत करुन राबविण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे .
ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासन




SHARE THIS

Author:

0 comments: