03 December 2015

सुधारित पोलीस शिपाई भरती पूर्व प्रशिक्षण वर्ग योजना




1.      मैदानी चाचणीचे प्रशिक्षण :
2.      उमेदवारांच्या निवडीसाठी अटी व शर्ती खालीलप्रमाणे :-
3.      शैक्षणिक पात्रता
4.      निवड प्रक्रिया :



अल्पसंख्यांकांच्या सर्वांगिण कल्याणासाठी केंद्र शासनामार्फत 15 कलमी कार्यक्रम राबविण्यात येत असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून अल्पसंख्यांक समाजामधील उमेदवारांना स्पर्धात्मक परीक्षेमध्ये समान संधी मिळण्याच्या दृष्टीने तसेच शासकीय सेवामध्ये अल्पसंख्यांकांचे असलेले अत्यल्प प्रमाण विचारात घेता महाराष्ट्र शासनाने अल्पसंख्यांक समाजामधील उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्ग आणि मार्गदर्शन केंद्रे सुरु करण्याची योजना सुरु केली आहे.

या योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन अधिकाधिक अल्पसंख्यांक उमेदवार स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्ग आणि मार्गदर्शन केंद्र यांचा लाभ घेऊन मोठया प्रमाणात शासकीय सेवेचा लाभ घेऊन अधिकधिक उमेदवार वेगवेगळया अधिकारी पदापर्यत जाऊ शकतील. या योजनेबाबत थोडक्यात माहिती.

योजनेचे स्वरुप, कार्यक्षेत्र व पात्र अर्जदार- या योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी 2 महिन्यांचा राहील. लेखी परीक्षा व मुलाखतीसाठीचे प्रशिक्षण कालावधीत अल्पसंख्यांक उमेदवारांना पोलीस भरतीपूर्व परीक्षेसाठी पूर्व तयारीकरिता मराठी भाषा, सामान्य ज्ञान, लेखी परीक्षा, मानचित्र अभ्यास, मुलाखत कौशल्य याबाबत प्रशिक्षण देण्यात येईल.


मैदानी चाचणीचे प्रशिक्षण :

प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यास धावणे 100 मीटर, 400 मीटर, 800 मीटर, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, अडथळयांची शर्यत, स्टॅडिंग रोप, मंकी रोप, रस्सी चढणे (रॅपलींग) सॅटिअप्स, पुलअप्स, चिनअप, पद कवायत, रायफल फायरिंग, ट्रेडिंग सुविधा उपलब्ध असल्यास पोहणे इत्यादी विषयांचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण देण्यात येईल. अन्य प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यास अग्निशमन रोड टॅफिक ट्रेनिंग, प्रथमोपचार स्वास्थ्य शिक्षा वायरलेस कम्युनिकेशन, व्यक्तिमत्व विकास ,आपत्ती निवारण व्यवस्थापन, वाद्यवृंद प्रशिक्षण याबाबतचे प्रशिक्षणही देण्यात येईल.

उमेदवारांच्या निवडीसाठी अटी व शर्ती खालीलप्रमाणे :-

प्रशिक्षणार्थीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रुपये 2 लाख 50 हजार पेक्षा जास्त नसावे, उमेदवार हा अल्पसंख्यांक समाजातील असावा (मुस्लीम, ख्रिश्चन, बौध्द, शीख, पारसी व जैन), उमेदवाराचे वय 18 ते 25 वयोगटातील असावा, उमेदवाराची उंची पुरुष 165 सें.मी. व महिला 155 सें.मी. छाती- पुरुष 79 सें.मी. (फुगवून 84 सें.मी.)

शैक्षणिक पात्रता

इयत्ता बारावी पास असावा, रहिवासी दाखला, सेवा योजना कार्यालयातंर्गत नांव नोंदणी दाखला व ओळखपत्राची सत्यप्रत देणे आवश्यक राहील, उमेदवार शारिरीकदृष्टया निरोगी व सक्षम असावा, निवडलेल्या उमेदवारांपैकी किमान 70 उमेदवार मुस्लीम अल्पसंख्यांक समाजातील 20 उमेदवार बौध्द, समाजातील 4 उमेदवार, ख्रिश्चन समाजातील 4 उमेदवार, जैन समाजातील प्रत्येकी एक उमेदवार, शीख व पारसी समाजामधून निवडण्यात येईल. ख्रिश्चन, जैन, शीख आणि पारसी समाजांमधून उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर अल्पसंख्यांक समाजांमधील उमेदवार निवडण्यात येतील.

निवड प्रक्रिया :

प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड करतांना गृह विभागाद्वारे निश्चित केलेली शैक्षणिक अर्हता व शारिरीक पात्रता धारण करणा-या प्रत्येक जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील उमेदवारांकडून जाहिरातीद्वारे अर्ज मागवून त्यामधून 100 उमेदवारांची निवड जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत करण्यात येते.

पोलीस शिपाई भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण देण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करुन इच्छुक संस्थांकडून अर्ज मागविण्यात यावेत. शासनमान्या नोंदणीकृत, नामांकित आणि अनुभवी शैक्षणिक संस्था (मान्यताप्राप्त शाळा, महाविद्यालये) आणि प्रशिक्षण संस्था यांच्याकडून प्राप्त झालेल्या अर्जामधून प्रशिक्षण संस्थांची निवड करण्यात यावी. निवडलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीस प्रशिक्षणा दरम्यान रुपये 1500/- प्रतिमाह प्रमाणे विद्यावेतन देण्यात येईल., निवडलेल्या प्रशिक्षण संस्थेस प्रशिक्षणार्थींना द्यावयाचे वाचन साहित्य आणि प्रशासकीय बाबींसाठी संस्थेस प्रती प्रशिक्षणार्थी रुपये 300/- प्रमाणे अनुदान देण्यात येईल, निवडलेल्या प्रशिक्षण संस्थेस प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याकरिता सामान्यज्ञान, मराठी भाषा आणि शारिरीक क्षमता हे विषय शिकविण्याकरिता दोन प्रशिक्षकांसाठी प्रतिमाह एकूण रुपये 30 हजार प्रमाणे दोन महिन्यांसाठी 60 हजार रुपये एवढे माधन देण्यात येईल, निवडलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीस प्रशिक्षण दरम्यान चहापान व अल्पोहार देण्यासाठी होणा-या खर्चापोटी रुपये 15/- प्रतीदिन प्रती प्रशिक्षणार्थी एवढे प्रशिक्षण संस्थेस देण्यात येईल, गणवेश साहित्यासाठी प्रत्येक प्रशिक्षणार्थीस 1 हजार रुपये, प्रशिक्षण दरम्यान चहापान व अल्पोपहार देण्यासाठी होणा-या खर्चापोटी रुपये 15 प्रतीदिन, प्रती प्रशिक्षणार्थी एवढे अनुदान प्रशिक्षण संस्थेस देण्यात येईल.  तरी अधिकाधिक अल्पसंख्यांक उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा



स्त्रोत : महान्यूज http://www.mahanews.gov.in/Home/HomeDetails.aspx?str=MPY0LfPfIk8= 

SHARE THIS

Author:

0 comments: